SCHOOL CHALE HUM

SCHOOL CHALE HUM
Educational blog

blog

animated-school-image-0043
नमस्कार शिक्षक बंधुनो माझ्या BLOG वरुन आपल्याला विविध महत्वपुर्ण लिंक दिलेल्या आहेत. त्या लिंक च्या माध्यमातुन तुम्ही विविध संकेतस्थळांना भेटी देऊ शकता व माहिती घेऊ शकता.

गणिती उखाणे

गणिती उखाणे



1)रविवार नंतर सोमवार येतो ....
रविवार नंतर सोमवार येतो..... 
प्रत्येक रूण संख्येचा वर्ग ...
नेहमीच  धन होतो.

2) महादेवाला आवडतात बेलाचे पान...
महादेवाला आवडता बेलाचे पान....
कोणत्याही ञिकोणात एक बाजू...
दोन बाजूच्या बेरजेपेक्षा लहान....!!

3)भाजीत भाजी मेथीची.....
वर्तुळ माझ्या प्रितीची...

4)स्वच्छता तेथे ईश्वर वसते,
स्वच्छता तेथे ईश्वर वसते,
अन,
शुन्यत्तेर संख्या चा घातांक शून्य असेल तर किंमत 1च असते !
5)भारताने मॅच जिंकली.....
चार गडी राखून .....
परिमिती काढतो मी....
आकृती आखून ....

6)दोनचा वर्ग चार.... !!
चार चा वर्ग सोळा.... !!!!
गणिताचे उखाणे घ्यायला, सुवासिनी झाल्या गोळा..!!!

7)झारखंड ची राजधानी रांची
ञिकोणाचे क्षेत्रफळ 1/2×पाया ×उंची

8)जुन्या हजार पाचशेच्या बंद झाल्या नोटा
खरेदी वजा विक्री बरोबर होईल तोटा
9)मी आणि माझे विद्यार्थी दररोज खातो काजू ... चौरसाची परिमिती 4 × बाजु.

10)खोप्यात खोपा सुगरणीचा खोपा
विक्री वजा खरेदी बरोबर होईल नफा

11)दहा किलो म्हणजे एक मन...!!
घनाचे घनफळ बाजूचा घन....!!

12)काश्मीर म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग....
चौरसाचे क्षेत्रफळ बाजूचा वर्ग ...!!

13)जीवाला जीव देतो तोच खरा मित्र
गणित सोडवायला माहिती  हवीत सुत्र

14) फुलात फुल चाफा,
 विक्री - खरेदी बरोबर नफा.

15)सम आणि व्यस्त हे चलनाचे प्रकार
पहिल्यात असते गुणोत्तर तर दुसर्यात गुणाकार

16)"गोड" म्हणजे "स्वीट"..
"कडू" म्हणजे "बीटर"..!!
एक घनमीटर म्हणजे..
 एक हजार लीटर....!!!!

17) महादेवाच्या पिंडीसमोर उभा आहे नंदी
आयताचे क्षेञफळ लांबी x रूंदी.

18) हिमालयातील काश्मिर म्हणजे भूलोकातील स्वर्ग
चौरसाचे क्षेञफळ म्हणजे बाजूचा वर्ग.

19) देवीची ओटी भरू खणानारळाची
ञिकोणाचे क्षेञफळ म्हणजे १/२xपायाxउंची.

20) स्वातंञ्याची पहाट म्हणजे १९४२ ची चळवळ
सहाxबाजू वर्ग हे घनाचे पृष्ठफळ

21) तीन पानांचा बेल त्याला येते बेलफळ
लांबीxरूंदीxउंची हे इष्टिकाचीतीचे घनफळ.

No comments:

Post a Comment